Chirai Ghat Surgana | चिराई सेल्फी पॉईंट्स |निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! My Surgana

Chirai Ghat Selfie Point- निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे!Surgana 

चिराई घाट सेल्फी पॉईंट सुरगाणा - निसर्गरम्य पर्यटनाचे नवीन केंद्र.



सुरगाणा तालुक्यातील निसर्गरम्य चिराई घाट आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनण्यासाठी सज्ज होत आहे. प्रवासाच्या वाटेवर असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, चिराई घाटात लवकरच एक नयनरम्य 'चिराई सेल्फी पॉईंट' पर्यकांसाठी खुला होणार आहे. ते ठिकाण सुरगाणा पासून साधारण 10 km अंतरावर आहे, येथे प्रवासी सतत गाडी थांबवून थोडासा टाईमपास म्हणून थांबत असतात म्हणूंच पर्यटन विभागाने हे ठिकाण सेल्फी पॉईंट म्हणून कराचे ठरवले आहे.निसर्गाचे वरदान लाभलेले ठिकाण चिराई घाट हा केवळ एक प्रवास मार्ग नाही, तर तो निसर्गाचा एक अद्भुत खजिना आहे. पावसाळा असो वा हिवाळा, या घाटाचे रूप प्रत्येक ऋतूत बदलत असते. या विषयी सविस्तर माहिती या ब्लॉग द्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


येथील खास वैशिष्ट्य

  • पावसाळ्यातील सौंदर्य डोंगरउतारावरून वाहणारे पाण्याचे झरे, ओढ्यांचा खळखळ आवाज आणि चहूकडे पसरलेली हिरवळ मनाला मोहिनी घालते.
  • निसर्गाची संगीत मैफल पक्ष्यांची किलबिल आणि वारा यांचा सुरेल आवाज येथे नेहमीच घुमत असतो.
  • पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे दाट धुक्याची चादर पसरते. हवेचा गारवा आणि सतत वाहणारा वारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
  • Panoramic view या सेल्फी पॉईंटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथून दिसणारे दृश्य. येथे उभे राहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण सुरगाणा शहर, आजूबाजूची खेडी, हिरवेगार डोंगर, शेती आणि जलसंधारणासाठी बांधलेले छोटे-मोठे बंधारे एका नजरेत दिसतात. 
  • सापुताऱ्याकडे जाणारे अनेक पर्यटक आता वाटेत थांबून या निसर्गाचा आनंद घेऊ शकतील आणि आपल्या आठवणी सेल्फीच्या माध्यमातून जतन करू शकतील.

प्रवाशांसाठी सुरक्षिततेची महत्त्वाची सूचना

  1. चिराई सेल्फी पॉईंट हे रस्त्यालगत (Highwayside) असल्याने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे:
  2. वाहन पार्किंग: आपली गाडी योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पार्क करा.
  3. रस्ता ओलांडणे: घाट रस्ता असल्याने आणि वळणावर गाड्यांचा वेग जास्त असू शकतो, त्यामुळे रस्ता ओलांडताना विशेष काळजी घ्या.
  4. उताराचा भाग: हे ठिकाण घाटाच्या उतारामध्ये असल्याने सुरक्षित अंतरावरूनच सेल्फी काढा.


Traval Guide /Road map(येथे कसे पोहचावे )

1.नाशिक मार्गे -बोरगाव - चिराई 

2.सापुतारा मार्गे -हतगड - चिराई 

3.धरमपूर मार्गे -उंबरठाण -सुरगाणा -चिराई

4.वासदा मार्गे - बर्डीपाडा -उंबरठाण -सुरगाणा -चिराई


हे पण वाचा 👇


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. चिराई सेल्फी पॉईंटला भेट देण्यासाठी उत्तम वेळ कोणती?

उत्तर: पावसाळा आणि हिवाळा (जून ते फेब्रुवारी) हा काळ या ठिकाणाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

2. येथे पोहोचणे सोपे आहे का?

उत्तर: हो, हे ठिकाण सुरगाणा ते सापुतारा मार्गावर असल्याने पर्यटकांना सहज पोहोचता येते.

3. सेल्फी पॉईंटवर काही सुविधा आहेत का?

उत्तर: हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात विकसित केले जात आहे. पर्यटकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःची खाण्यापिण्याची सोय करावी आणि कचरा न टाकता परिसराची स्वच्छता राखावी.

4. येथे सेल्फी काढताना काय काळजी घ्यावी?

उत्तर: रस्ता हा महामार्गाचा भाग असल्याने गाड्यांचा वेग लक्षात घेऊन सुरक्षित अंतरावरूनच फोटो काढावेत.


पर्यटनाच्या आगामी हंगामात सुरगाणा पर्यटनाला नवी उंची देणाऱ्या 'चिराई सेल्फी पॉईंट'ला नक्की भेट द्या! अधिक माहितीसाठी पाहत राहा - mysurgana.in

Post a Comment

Previous Post Next Post