निसर्गाचा चमत्कार आणि आस्थेचे केंद्र: कणसरा माता तातापाणी तीर्थक्षेत्र (पिंपळसोंड)|Tatapani Hot Spring
आपल्या नाशिक जिल्हातील सुरगाणा तालुक्यात आणि आसपासच्या परिसरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी त्यांच्या ऐतिहासिक, धार्मिक किंवा नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे भाविकांना आणि पर्यटकांना भुरळ घालतात. असेच एक अनोखे आणि निसर्गाचा चमत्कार अनुभवता येणारे ठिकाण म्हणजे पिंपळसोंड उंबरपाडा येथील "कणसरा माता तातापाणी तीर्थक्षेत्र".शब्दसहा अर्थ जर म्हटलं तर 'ताता= गरम' आणि पाणी म्हणजे पाणी (Tatapani Hot spring pimpalsond)हे स्थान केवळ एक धार्मिक तीर्थक्षेत्र नसून निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराचे साक्षीदार आहे. चला तर मग, आजच्या ब्लॉगमध्ये आपण या पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणाची सविस्तर माहिती जा ब्लॉग मधून जाणून घेऊया.
1. कुठे आहे हे तीर्थक्षेत्र?
हे तीर्थक्षेत्र सुरगाणातील पिंपळसोंड (उंबरपाडा) या भागात स्थित आहे. मुख्य एन्ट्रास च्या पाटीवर लिहिल्याप्रमाणे, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव त्याच्या शांत आणि हिरव्यागार वातावरणासाठी ओळखले जाते. शहरी गजबजाटापासून दूर, अध्यात्म आणि शांततेचा शोध घेणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
2. मुख्य आकर्षण: गरम पाण्याचे कुंड (तातापाणी)( Hot spring in Surgana )
या क्षेत्राचे सर्वात मोठे आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील 'गरम पाण्याचे कुंड'(तातापाणी). या ठिकाणी नंदी च्या मुखाद्वारे पवित्र असे गरम पाणी येते. हे पाहणे साठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविक व पर्यटक सतत या ठिकाणी भेट देत असतात.जमिनीतून नैसर्गिकरित्या गरम पाणी बाहेर येणे हा एक भौगोलिक निसर्गाचा चमत्कार मानला जातो.
औषधी गुणधर्म: स्थानिक आणि येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेनुसार, या गरम पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे विकार दूर होतात आणि शरीराचा थकवा नाहीसा होतो. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
3.कणसरा माता: आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक (Kansara Mata- Tatapani )
हे स्थान केवळ गरम पाण्याच्या कुंडासाठीच नाही, तर 'कणसरा माता' किंवा अन्न देवता' हे यांच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. स्थानिक आदिवासी आणि ग्रामीण संस्कृतीत कणसरा मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता निसर्गाचे, समृद्धीचे आणि अन्नाचे प्रतीक मानली जाते. मंदिरात येऊन मातेचे दर्शन घेतल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.भाविक येथे येऊन मनोभावे पूजा अर्चना करतात, नारळ अगरबत्ती वाहतात.
4. यात्रेचा उत्साह आणि स्थानिक संस्कृती
दरवर्षी महाशिवरात्री ला भावीकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. गुजरात,महाराष्ट्र या राज्यातून अनेक लोक या दिवशी येतात.प्रचंड उत्साह असतो
रंगीबेरंगी दुकाने: मंदिराच्या परिसरात तात्पुरते मांडव, रंगीबेरंगी छत्र्या, खेळण्यांचे आणि प्रसादाचे स्टॉल्स लावलेले दिसतात. तसेच बांबू हस्त कलेच्या वस्तूंचे स्टॉल लागतात व लहान मुलांसाठी फुगे आणि खेळणी या जत्रेची शोभा वाढवतात.
सांस्कृतिक दर्शन: येथे आल्यावर तुम्हाला स्थानिक लोकांचे आदरातिथ्य, त्यांची पारंपरिक वेशभूषा आणि संस्कृती अतिशय जवळून अनुभवता येते. तसेच भोवडा मुखवटाचे प्रदर्शन केले जाते. रानविहीर, मोहपाडा, गोण दगड, खुंटविहीर, गाळबारी, माळगुंदे, पिंपळसोंड, उंबरपाडा असे लागतचे वेगवेगळ्या गावातून भजनी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावतात.
या पर्यटन स्थळाचा एक संदेश आहे "प्रकृती हि जीवन... चला करूया संकल्प जल, जंगल, जमीन संवर्धनाचा..!"
हा संदेश आपल्याला आठवण करून देतो की, आपण ज्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येतो, त्याचे रक्षण करणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे. पाणी वाचवणे, जंगले जपणे आणि जमिनीचे प्रदूषण रोखणे हाच खऱ्या अर्थाने या तीर्थक्षेत्राचा आदर ठरेल.
येथे कसे पोहचावे? (Road Map)
1.सुरगाणा -अंबाठा -खुंटविहीर - माळगोंदा -उंबरपाडा -तातापाणी
2.नाशिक - बोरगाव -सुरगाणा - अंबाठा - खुंटविहीर - उंबरपाडा - ताता पाणी
3.धर्मपूर -उंबरठाण- वांगण-चिंचमाळ -उंबरपाडा -तातापाणी
4.वासदा-बर्डीपाडा-हाडकाईचोंड -दगडपाडा -पिंपळसोंड -तातापाणी
तातापाणी तीर्थक्षेत्राला भेट देण्यापूर्वी काही टिप्स:
- उत्तम वेळ: हिवाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर या ठिकाणी भेट देणे अतिशय आल्हाददायक ठरते, कारण या दिवसांत गरम पाण्यात स्नान करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
- स्वच्छता राखा: धार्मिक स्थळ आणि पाण्याचे कुंड स्वच्छ ठेवण्यास मदत करा. प्लास्टिकचा वापर टाळा.
- कुंड जवळ प्लास्टिक बादली असते,कुंडा मधून पाणी काढून बाहेर अंघोळ करावी.
- महिलांना अंघोळीसाठी स्वातंत्र्य बांधरूम बांधले आहेत.
- देव पूजेचे साहित्य येथेच उपलब्ध असते. एक छोटे दुकान आहे.
- गाडी पार्किंग ची व्यवस्था आहे पण गाडी रांगेत लावा.
- तीर्थ क्षेत्र आवारात मध्यपान करण्यास शक्त मनाई आहे.
- स्थानिक खाद्यपदार्थ: जत्रेच्या ठिकाणी किंवा आसपास मिळणाऱ्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आणि रानभाज्यांचा नक्की आस्वाद घ्या.
हे पण वाचा 👇
भिवतास धबधबा -Top Waterfall in Surgana
साखळ चोंड धबधबा - Hidden Waterfall in Surgana
जवळपासचे हॉटेल
कुंदा रिसॉर्ट व जंगली हॉटेल-पिंपळसोंड तुमच्या सहलीसाठी उत्तम पर्याय! जर तुम्हाला राहण्यासाठी आणि मनोरंजनासाठी एक परिपूर्ण ठिकाण हवे असेल, तर 'कुंदा रिसॉर्ट' हा सर्वोत्तम पर्याय आहे; येथे राहण्याची सोय, स्वादिष्ट जेवण, सायकलिंग, विविध गेम्स, झोका आणि सेल्फी पॉईंट्सची उत्तम सोय उपलब्ध आहे. तसेच, तुम्हाला अस्सल गावरान चवीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर 'जंगली हॉटेल' येथे नक्की भेट द्या, जिथली 'गावरान चिकन थाळी' अत्यंत प्रसिद्ध आणि चविष्ट आहे.
निष्कर्ष
कणसरा माता तातापाणी तीर्थक्षेत्र (पिंपळसोंड) हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून ते मनःशांती मिळवण्याचे, निसर्गाचा चमत्कार अनुभवण्याचे आणि आपल्या संस्कृतीशी जोडले जाण्याचे एक उत्तम माध्यम आहे. जर तुम्ही वीकेंडला एखाद्या वेगळ्या आणि पवित्र ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर या जागेला नक्की भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. कणसरा माता तातापाणी तीर्थक्षेत्र कुठे आहे?
हे तीर्थक्षेत्र नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड (उंबरपाडा) येथे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे.
2. तातापाणी (गरम पाणी) कुंडात स्नान करण्याचे काय महत्त्व आहे?
येथील नंदीच्या मुखातून नैसर्गिक गरम पाणी येते. भाविकांच्या श्रद्धेनुसार, या पाण्यात स्नान केल्याने शरीराचा थकवा नाहीसा होतो आणि त्वचाविकार दूर होण्यास मदत होते.
3. येथे राहण्याची आणि जेवणाची सोय कशी आहे?
राहण्यासाठी: 'कुंदा रिसॉर्ट' उत्तम आहे, जिथे राहण्यासोबतच सायकलिंग, गेम्स आणि सेल्फी पॉईंट्सची सुविधा आहे.
जेवणासाठी: अस्सल गावरान चवीसाठी 'जंगली हॉटेल' प्रसिद्ध आहे, विशेषतः तिथली 'गावरान चिकन थाळी' नक्की ट्राय करा.
4. तीर्थक्षेत्राला भेट देण्यापूर्वी पर्यटकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
स्वच्छता: प्लास्टिकचा वापर टाळा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
नियम: कुंडातून पाणी बादलीने काढून बाहेर अंघोळ करावी. महिलांसाठी स्वतंत्र बाथरूमची सोय आहे.
शिस्त: गाडी पार्किंग रांगेत लावावी आणि तीर्थक्षेत्राच्या आवारात मद्यपान करणे सक्त मनाई आहे.
5. दर्शनासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आणि जवळची इतर प्रेक्षणीय स्थळे कोणती?
सर्वोत्तम वेळ: हिवाळा किंवा पावसाळ्यानंतरचा काळ, जेव्हा वातावरण आल्हाददायक असते.
तुम्ही कधी अशा गरम पाण्याच्या कुंडाला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव खाली Comments मध्ये नक्की शेअर करा आणि हा ब्लॉग तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करायला विसरू नका!
जय कणसरा माता! जय आदिवासी! जय जोहार!

No comments:
Post a Comment