Wednesday, June 3, 2026

साखळचोंड धबधबा, पिंपळसोंड: सुरगाण्याचे निसर्गरम्य पर्यटन स्थळ!| my surgana



निसर्गाचा मुक्त अविष्कार: पिंपळसोंडचा 'साखळ चोंड' धबधबा!(Sakhalchond Waterfall)

Sakhal Chond Waterfall Pimpal-Sond Surgana

पावसाच्या सरी निसर्गाला न्हाऊ घालतात, तेव्हा काही ठिकाणे खऱ्या अर्थाने बहरून येतात. सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड गावात दडलेले असेच एक निसर्गरम्य ठिकाण ते म्हणजे 'साखळ चोंड धबधबा'. अनेकदा आपण फक्त प्रसिद्ध असलेल्या पर्यटनाच्या ठिकाणीच गर्दी करतो, पण आपल्या स्वतःच्या मातीतच दडलेल्या अशा नैसर्गिक हिऱ्यांचा अनुभव घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जर तुम्हाला शहराच्या धावपळीतून सुटका हवी असेल आणि निसर्गाच्या शांततेत काही क्षण घालवायचे असतील, तर साखळचोंड धबधबा हे तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. चला तर मग, या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया या धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि तिथल्या निसर्गाचा मुक्त अविष्कार! 


साखळचोंड काय आहे? (Sakhalchond Waterfall)

पिंपळसोंडच्या परिसरात निसर्गाने दिलेली देणगी आहे. साखळचोंड हा केवळ एक धबधबा नाही, तर तो या पिंपळसोंड परिसराचा एक जिवंत भाग आहे. घनदाट झाडीतून आणि काळ्या खडका वरून खळाळत येणारे हे पाणी पाहताना, आपण शहराच्या धावपळीतून किती दूर आलो आहोत, याचा सुखद अनुभव नक्कीच मिळेल.

इथे तुम्हाला मिळणारी शांतता ही खऱ्या अर्थाने ' Maditation 'सारखी असते. फक्त पाण्याचा आवाज, झाडांची सळसळ आणि दूरवर ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट... या पलीकडे इथे काहीही नाही.


तिथे पोहोचण्याचा प्रवास

साखळ चोंड धबधब्याकडे जाणारी वाट ही ट्रेकिंगच्या आवडीच्या लोकांसाठी, निसर्गाच्या सानिध्यात चालताना कधी दम लागत नाही, उलट आपण नवनवीन गोष्टी पाहत पुढे जातो. रस्ते दुर्गम असले तरी, तिथे पोहोचल्यानंतर जे दृश्य दिसते, ते सर्व थकवा एका क्षणात विसरून टाकते.वरून धबधबा पर्यंत जाण्यासाठी स्थानिक लोकांकडून बांबूच्या काठ्या फक्त 10 ते 20 रुपये दराने विकत घ्या आणि परत करा.चढताना व उतरताना या काठीचा खूप उपयोग होईल.


एक छोटी टीप: 

हा भाग काहीसा दुर्गम आहे. त्यामुळे सोबत पिण्याचे पाणी आणि हलका नाश्ता नक्की ठेवा. तसेच, जाण्यापूर्वी स्थानिक मित्रांशी किंवा गावकऱ्यांशी वाटेबद्दल चर्चा करा, कारण पावसाळ्यात निसर्गाचे रूप बदललेले असते.धबधबा पर्यंत जाण्यासाठी एक छोटी पाय वाट आहे,पावसाने वाटेतील माती वाहून जाते म्हूणन काळजी पूर्वक जावे.


निसर्गाचे जतन करणे आपली जबाबदारी

साखळ चोंडसारखी ठिकाणे आजही इतकी सुंदर आहेत, कारण तिथे मानवी हस्तक्षेप कमी आहे. आपण पर्यटनाला जातो तेव्हा हे नक्की लक्षात ठेवूया की: 


1.प्लास्टिकचा वापर टाळा: 

जेवढे साहित्य आपण घेऊन जाऊ, तेवढेच परत आणू. निसर्गात प्लास्टिकचे कचरा टाकणे म्हणजे आपल्याच सौंदर्याचा गळा घोटण्यासारखे आहे.येथे गुजरात वरून शेकडो पर्यटक येतात आणि प्लास्टिक बॉटल आणि प्लास्टिक पिशवी इत्यादी तिथेच टाकून जातात. हे काही बरोबर नाही आपण स्वतः नियम लावले की आपोआप निसर्ग स्वच्छ आणि सुंदर राहील.


2.सुरक्षितता:

 या ठिकाणी तीन टप्प्या मध्ये तीन धबधबा पाहवयस मिळतात आणि धबधब्यांच्या खडकांवर शेवाळ असते, त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते. पाण्याजवळ जाताना खूप काळजी घ्या आणि सुरक्षित अंतर राखूनच आनंद घ्या.कारण काही वर्षांपूर्वी एक पर्यटकाचा अपघाती मृत्यू झालेला होता. स्वतः नियम पाळा म्हणजे झाले.


3.निसर्गाचा सन्मान: 

हा परिसर केवळ फिरण्यासाठी नाही, तर तो आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.म्हणून पाहावयास मिळतो. आपण जेवढा 

निसर्गाला देऊ त्यापेक्षा निसर्ग आपल्याला दुपटीने देतो. निसर्ग खूप काही शिकवून जातो.

नक्की का जावे?

जर तुम्हाला रोजच्या रुटीनमधून कंटाळा आला असेल, तर साखळ चोंड धबधबा तुम्हाला पुन्हा एकदा ताजेतवाने करेल.मित्रांसोबत एक दिवस घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथल्या मातीचा सुगंध आणि धबधब्याचा गारवा तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे यायला भाग पाडेल.इथे एक शांत वातावरण आहे जे कुठे धबधबा जवळ नाही इथे जास्त गर्दी नसते, कारण हे खूप कमी लोकांना माहिती आहे की साखळ चोंड नावाचा एक धबधबा देखील सुरगाण्यात आहे. तर या वर्षी नक्की भेट द्या.


FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

१. साखळचोंड धबधबा कुठे आहे?

उत्तर: हा निसर्गरम्य धबधबा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड गावात स्थित आहे.


२. हा धबधबा पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

उत्तर: पावसाळानंतर हा धबधबा पाहणे योग्य आहे.

३. तिथे जाताना कोणती काळजी घ्यावी?

उत्तर: धबधब्याकडील खडकांवर शेवाळ असल्याने पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याजवळ जाताना सुरक्षित अंतर राखा आणि अत्यंत काळजी घ्या.

४. हे ठिकाण कुटुंबासोबत जाण्यासाठी योग्य आहे का?

उत्तर: नाही, कारण हे ठिकाण पर्यंत पोहचण्यासाठी खूप खाली उतरावे लागते.लहान मुलांना शक्यतो घेऊन जाऊ नका.

तुम्ही कधी साखळचोंड धबधबा ला भेट दिली आहे का? किंवा लवकरच जाण्याचा विचार करत आहात? तुमचे अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या आठवणींनी इतरांनाही तिथे जाण्याची प्रेरणा मिळेल!


अशाच निसर्गरम्य आणि अस्सल सुरगाण्याच्या गोष्टी वाचण्यासाठी, आमच्या mysurgana.in ला नियमित भेट देत राहा!



No comments:

Post a Comment

भोरमाळचे नवीन आकर्षण - 'आदी सबरी कृषी पर्यटन' केंद्र! |My Surgana

  अस्सल ग्रामीण अनुभवाची अनुभूती: लवकरच येतेय 'आदी सबरी कृषी पर्यटन केंद्र'. निसर्गाच्या सानिध्यात, शहराच्या धकाधकीपासून दूर काही नि...